जर तुम्हाला कुणी सांगितले की तुम्ही विमानाशिवाय ८८ सेकंदात १००० फूट उंचीवर जाऊ शकतात, तर तुम्हाला खोटं वाटेल. ही तर उडायची गोष्ट झाली असेच कुणाला पण वाटेल. साहजिकच ८८ सेकंदात तर दुसऱ्या कोणत्याही इतर मार्गाचा वापर केला तरी देखील १००० फूट उंच जाणे कठीण आहे.
पण चीनमधील हुनान प्रांतातील झांगझियाजी राष्ट्रीय उद्यानात मात्र अनेक लोक रोजच हा अनुभव घेत असतात. या राष्ट्रीय उद्यानात एक प्रचंड लांब लिफ्ट आहे. या लिफ्टच्या मदतीने लोकांना १००० फूट उंचीवर जाता येते. ही जगातील सर्वाधिक उंच आउटडोर लिफ्ट आहे.







