देशातलीच नाही तर जगातली सर्वात जुन्या भाषेपैकी एक भाषा म्हणून संस्कृत ओळखली जाते. ३५००वर्षांपासूनची मोठी परंपरा तिला लाभली आहे. स्कोरिंग विषय म्हणून तुम्हीही आठवी ते दहावी तुम्ही संस्कृत शिकले असेलच म्हणा. पण देव, माला आणि राम सोडले तर कुणालाच शाळेत शिकलेले जास्त काही आठवण्याची शक्यता कमीच आहे. हिंदी, इंग्रजी आपल्या बोलीभाषेचा भाग बनल्या, पण कुणी येताजाता संस्कृत काही झाडात नाही.
पण आता एका टॅक्सी ड्रायव्हमुळे पुन्हा एकदा संस्कृत चर्चेत आली आहे. मंडळी, हा भाऊ एखादया पंडितासारखी संस्कृत बोलतो. हा भाऊ प्रत्येक शब्द अस्खलित बोलतो. या टॅक्सी ड्रायव्हरच्या संस्कृत बोलण्याने सगळ्यांची मने जिंकली आहेत.
Sanskrit speaking cab driver in Bengaluru pic.twitter.com/2Kc5tRrnzU
— Girish Bharadwaja (@Girishvhp) June 11, 2019
४५ सेकंदाच्या या क्लिपमध्ये हा बंगळुरूचा टॅक्सी ड्रायवर त्याच्या गाडीत बसलेल्या प्रवाशासोबत संस्कृतमध्ये गप्पा मारत असल्याचे दिसत आहे. हा विडिओ ट्विटरवर गिरीश भारद्वाज नावाच्या एका यूजरने टाकला आहे.
या विडिओत प्रवासी आणि त्या टॅक्सी ड्रायव्हर दरम्यान संवाद पाहायला मिळत आहे. प्रवासी ड्रायव्हरला विचारतो 'तुझे नाव काय आहे'
तो ड्रायव्हर त्याचे नाव सांगतो पण विडिओत व्यवस्थित ऐकू येत नाही. नंतर तो प्रवासी त्याला विचारतो 'तुम्हाला संस्कृत केव्हापासुन येते?' त्याला उत्तर देताना ड्रायव्हर सांगतो कि त्याने संस्कृत राजा राजस्व शहर यांच्या ध्यान शिबिरात जेव्हा तो तरुण होता तेव्हा शिकली आहे.






