सध्या संपूर्ण जग सामोरे जात असलेली कुठली समस्या असेल तर ती म्हणजे पर्यावरणाचा नाश!! अनेक शास्त्रज्ञ गळा खरवडून सांगत आहेत की अजूनही वेळ गेलेली नाही, आपण पृथ्वी वाचवू शकतो. पण अगदी काहीच वर्षांनी जर आपण सकारात्मक पाऊले उचलली नाहीत तर आपल्या डोळ्यांदेखत पृथ्वीचा नाश बघण्याची वेळ आपल्यावर येण्याची शक्यता आहे राव!!
ग्लोबल वॉर्मिंग, दरवर्षी अधिकच दाहक होत चाललेला उन्हाळा, ऍसिड पाऊस.. यावर उपाय काय आहे माहीत आहे का मंडळी? तर जास्तीत जास्त झाडे लावणे!! मंडळी, एवढा सोपा उपाय करून आपण पृथ्वी वाचवू शकतो.









