एकेकाळी हिंदी-चीनी भाईभाई म्हणत चीननं भारताला फसवलं. पण आता काही ही फसवेगिरी चालायची नाही. भारत आणि चीन यांच्या दरम्यान होणारा संघर्ष आता आपल्याला काही नवीन नाही. चीनची सध्याची घुसखोरी तर अतिच झालीय. सबब चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालण्याची इच्छा आणि मागणी, दोन्हींनी अगदी जोर धरलाय.
चीनमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असल्यामुळे चीन अत्यंत कमी दरात काही वस्तू संपूर्ण जगभरात उपलब्ध करून देतो. भारतातही बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोबाईल्स चीनमधून आयात केले जातात. त्यातल्या त्यात मोबाईल्सचा खप तर खूप जास्त आहे. भावनिक होऊन भारतीयांना हे चायनीज कंपनीचे मोबाईल घ्यायचे नसतील तर त्यासाठी दुसरा कुठला चांगला पर्याय आपल्याकडे आहे का हा प्रश्न कुणालाही पडेल. आज या लेखामध्ये आम्ही या प्रश्नाची काही उत्तरं घेऊन आलो आहोत.









