गेले दोन दिवस तुमचे फेसबुक मित्र त्यांच्या वॉलवर वेगवेगळे अवतार पोस्ट करत आहेत ना? इंग्रजीनं आपला संस्कृत अवतार शब्द केव्हाच आपलासा केलाय आणि आता फेसबुक आपल्याला आपला अवतार तयार करायला मदत करत आहे. फक्त हा देवांच्या बऱ्याच जन्मांपैकी एक असतो तो अवतार नाही, तर "काय अवतार केला आहेस?" मधला अवतार आहे इतकंच!!
फेसबुक आपल्या युझर्ससाठी नेहमीच नवनवीन फिचर्स आणत असतं. नुकतंच फेसबुकने Bitmoji हे ॲप आणि आयफोनच्या Memoji या फिचरशी टक्कर द्यायला भारतीय वापरकर्त्यांसाठी 'अवतार' फिचर आणलंय. आतापर्यंत आपण फेसबुक कमेंट्स आणि चॅट विन्डोमध्ये वेगवेगळ्या इमोजी, स्टिकर्स, GIF वापरून स्वःच्या भावना व्यक्त करत होतो. या जोडीला आता तुमचा अवतारही आलाय.








