हा फोटो बिहारची राजधानी पटना येथील हनुमान नगरच्या एका घरातला आहे. या घरात स्थानिक व्यावसायिक प्रवीण त्याच्या पत्नी सोबत राहतो. त्याच्या घरातल्या आरशावर लिहीलंय “भाभीजी बहुत अच्छी हैं।” आणि खाली भाभीच्या नवऱ्याबद्दल म्हणजे प्रवीणबद्दल शिव्यांची लाखोली वाहिली आहे. या फोटो मागची गोष्ट आज जाणून घेऊया.
हे काम बिहारच्या चोरांनी केलेलं आहे. काही दिवसांपूर्वी या घरात चोर घुसले आणि त्यांनी घरातून ६० लाख रुपयांचे दागिने चोरले. शिवाय ३५ लाख रुपये रोकड पण त्यांनी लंपास केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी किचनमधून तेल, पीठ, तांदूळ, मॅगीचे पॅकेट्स, टूथपेस्ट आणि सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर एवढं सगळं चोरून नेलं.





