लोक एवढे रिकामटेकडे झाले आहेत की काहीही पाहतात असे म्हटलं तर खोटं ठरणार नाही. मध्यंतरी जेसीबीची खुदाई पाहणाऱ्या रिकामटेकड्या गर्दीचे व्हिडिओज व्हायरल झाले होते. पण आज जी गोष्ट सांगणार आहोत ती म्हणजे अभूतपूर्व आहे- पूर्वी असे कधी घडले नाही, पण पुन्हा होणार नाही याची खात्री मात्र देता येणार नाही.
एक माणूस युट्युबवर व्हिडीओ टाकतो. दोन तास तो फक्त बसून राहतो आणि काहीही, अक्षरश: काहीही करत नाही. काहीच म्हणजे काहीच नाही. कॅमेरा लावून भाऊ आरामात बसला आहे. कॅमेऱ्याकडे पाहत आहे. तुम्ही म्हणाल लोकांनी दुर्लक्ष केले असेल. अहं.. दोन तास काही न करणाऱ्या माणसाचा व्हिडीओ लोकांनी पाहिला. किती लोकांनी पाहिला माहितेय?? तब्बल २२ लाख!!!





