राव, प्यायलेला माणूस आपलं घर समजून शेजारच्या घरात शिरतो हे तर आपण पाहिलं असेल आणि अनुभवलं पण असेल, पण एका विमानाने अशी चूक केल्याचं कधी ऐकलंय का ? असं नुकतंच घडलंय मंडळी. हे विमान पण कोण्या साध्या कंपनीचं नव्हतं भाऊ. ते विमान होतं ब्रिटीश एअरवेजचं.
गल्ती से मिस्टेक....ब्रिटीश एअरवेजचं विमान जर्मनीच्या ऐवजी स्कॉटलंडला पोहोचलं !!


तर त्याचं झालं असं, की BAe 146 हे ब्रिटीश एअरवेजचं विमान निघालं होतं जर्मनीच्या ‘ड्युसेलडॉर्फ’ शहरी, पण चुकीच्या फ्लाइट प्लॅनमुळे विमान पोहोचलं चक्क स्कॉटलंडच्या राजधानीत. राव या गंभीर चुकीमुळे ब्रिटीश एअरवेजवर माफी मागण्याची वेळ आली आहे. तशी त्यांनी जाहीर माफी पण मागितली आहे.

राव या मागची गोष्ट थोडी वेगळी आहे. विमान जरी ब्रिटीश एअरवेजचं असलं तरी त्याला जर्मनीच्या WDL Aviation विमान कंपनीचे कर्मचारी चालवत होते. ब्रिटीश एअरवेज सोबत WDL Aviation ने ‘वेट लीझ’ करार केला होता. म्हणजे विमाना आणि कर्मचारी भाडेतत्वावर घेण्यात आले होते. मागची गोष्ट जरी अशी असली तरी सगळ्यांनी ब्रिटीश एअरवेजवर निशाणा साधला आहे. एकाने तर ट्विटरवर ब्रिटीश एअरवेजला नकाशा भेट दिला आहे.
तर, आता ब्रिटीश एअरवेज या गोष्टीचा पत्ता लावत आहे की ही चूक नेमकी झाली कशी. जगभर या एका चुकीमुळे ब्रिटीश एअरवेजचं हसं झालं आहे राव.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१