गेल्या एकदोन दिवसांत लोकांचे चेन फास्टिंगचे मेसेज आणि हातात पांढऱ्या कागदावर "मी .... कारणासाठी एक दिवस उपोषण केलं" असं म्हणणारे फोटोज पण आले असतील ना? काय आहे ही चेन फास्टिंगची भानगड? आणि हे लोक का उपोषण करत आहेत?
साध्या सोप्या शब्दांत चेन फास्टिंग म्हणजे साखळी उपोषण! सध्या ते का केलं जात आहे हे ही आता पाहूया.. पण त्याआधी पाहूयात या अभियानाची पार्श्वभूमी काय आहे.
रस्ता रुंदीकरण, आपण लोकांनी केलेलं अतिक्रमण, प्रदुषण, प्लॅस्टिक आक्रमण हे सगळं असो किंवा मग आजकाल देवराईंमधली वाढती वर्दळ पाह्यली की एक दिसतं की -जंगलांनी, नद्यांनी गेल्या काही दशकांत खूप सोसलंय. त्यातही दुर्दैव असं आहे की ज्या गावाला या जंगलांनी, नद्यांनी आणि समुद्राने बरंच काही दिलं, त्याच गावातल्या नागरिकांनी त्यांच्या कोलमडण्याकडे पूर्ण काणाडोळा केलाय.









