माझे एक मित्र आहेत. ते पुस्तकप्रेमी असल्याने पुस्तकं शोधत रद्दीची दुकानं पालथी घालत असतात. त्यांची काही निरीक्षणे लक्षणीय आहेत.
“रद्दीत आलेल्या डायऱ्या चाळून बघितल्या तर वर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यात नियमित नोंदी केल्या जातात. नंतरच्या आठवड्यात एखाद दिवसाच्या फरकाने आणि नंतर त्या तुरळक होऊन उरलेल्या महिन्यांची पाने कोरी असतात आणि डायरी लिहिण्याची हौस संपलेली असते”
आमच्या याच मित्राचे आणखी एक मूलभूत संशोधन असे की, प्रत्येक रद्दीच्या गठ्ठ्यात डेल कार्नेजीच्या 'How to Win Friends and Influence People' या पुस्तकाच्या किमान दोन प्रती अगदी ‘मिंट ’ कंडिशन मध्ये सहज मिळतात. असं का होतं याचं उत्तर ‘हौस’ या शब्दातच आहे.










