आयपीएल सुरू झाले तेव्हापासून दिग्गज खेळाडूंचा भरणा असून देखील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) सातत्याने आयपीएल ट्रॉफीपासून कोसभर दूर दिसत होती. पण मागील सीझनमध्ये बँगलोरने प्ले ऑफमध्ये जागा पटकावत चाहत्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. यावेळी देखील सलग दोन सामने जिंकत बँगलोर संघ फॉर्मात आला आहे. कालच्या सामन्यातील खरा हिरो ठरला तो ग्लेन मॅक्सवेल.
RCB vs SRH सामन्याचा खरा हिरो 'ग्लेन मॅक्सवेल'...RCB मध्ये त्याचा प्रवेश कसा झाला माहित आहे का ?


RCB चे सुरुवातीचे खेळाडू पटापट आऊट झाल्यावर मॅक्सवेलने बाजू सांभाळली. गड्याने एकट्याने ४१ बॉल्सवर ५ चौकार आणि ३ छक्क्यांची उधळण करत ५९ धावा केल्या. मॅक्सवेलचा RCB कडून हा पहिला सीझन आहे. गेले चार सीझन त्याने एकही अर्धशतक केले नाही तरी देखील कोहली त्याच्यासाठी आग्रही होता. २०१७, २०१८, २०१९ आणि २०२० असे चार सीझन तो विना अर्धशतक राहिला होता. ती कसर त्याने या सीझनच्या दुसऱ्याच सामन्यात भरून काढली.
गेल्या सीझनमध्ये तर मॅक्सवेलने पंजाबकडून खेळताना अतिशय सुमार कामगिरी केली. १३ सामन्यात त्याने फक्त १०८ धावा केल्या. पूर्ण सीझनमध्ये त्याने एक सिक्स देखील मारला नाही. असे असून देखील त्याला RCB ने १४ कोटी मोजून आपल्या संघात घेतले. मॅक्सवेल RCB मध्ये गेला याची कहाणी देखील रंजक आहे. स्वतः मॅक्सवेलने ही गोष्ट सांगितली आहे.

भारतात जेव्हा आयपीएलसाठी लिलाव सुरू होता, त्यावेळी न्यूझीलँडमध्ये रात्र होती. सर्व खेळाडू क्वारंटाईन होते. एडम झाम्पा या खेळाडूकडे RCB ची टोपी होती. त्याने ती टोपी बॅगेतून काढली आणि मॅक्सवेलला दिली. सोबत त्यांचा फोटो घेऊन तो विराट कोहलीला पाठवला. त्यात लिहिले होते, 'अभिनंदन, मी मॅक्सवेलला RCB ची पहिली टोपी दिली आहे.' दुसऱ्या दिवशी खरोखर मॅक्सवेलला RCB ने खरेदी केले होते.

मॅक्सवेलने अजून एक खुलासा केला होता, तो म्हणजे भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना विराटने मॅक्सवेलला सांगितले होते, 'आम्ही एका ऑस्ट्रेलियन हार्ड हिटिंग बॅट्समनला आमच्या संघात घेणार आहोत.' तो बॅट्समन स्वतः मॅक्सवेल आहे हे त्याला नंतर समजले. या सर्व गोष्टी बघितल्या तर मॅक्सवेलला संघात घेण्याचे RCB ने खूप आधीच ठरवले होते. मॅक्सवेलने देखील सलग दोन चांगल्या खेळ्या करत RCB चा विश्वास सार्थ ठरवला आहे.
टॅग्स:
संबंधित लेख

आयपीएल स्पर्धेतून अचानक गायब झालेले खेळाडू! एकाने तर केकेआरला बनवले होते चॅम्पियन...
२८ डिसेंबर, २०२२

आयपीएल लिलावात या ५ खेळाडूंवर असेल सर्वांची नजर; मोडू शकतात कमाईचे आजवरचे विक्रम...
२२ डिसेंबर, २०२२

आयपीएल स्पर्धेत या फलंदाजांनी पाडला आहे षटकारांचा पाऊस; यादीत केवळ २ भारतीय...
२० डिसेंबर, २०२२

आयपीएल २०२३ स्पर्धेच्या लिलावात हे ५ खेळाडू होऊ शकतात मालामाल! लागू शकते कोट्यावधींची बोली...
८ डिसेंबर, २०२२