पूर्वी म्हणायचे की कॅमेरा कधी खोटं बोलत नाही, पण आजच्या काळात कॅमेरा धडधडीत खोटं बोलतो. सोशल मिडीयावर असलेल्या फिल्टरमुळे कॅमेराला खरं सांगता येत नाही. पण म्हणतात ना सत्य लपत नसतं. चीनमधल्या लाखो लोकांना याचा अनुभव आलाय.
फिल्टर बंद पडल्यामुळे तिचं खरं रूप दिसलं...पण तिचे चाहते नक्की कशामुळे चिडलेत ??

काय आहे भानगड ?
त्याचं झालं असं की, Your Highness 'Qiao Biluo’ नावाची चायनीज व्लॉगर लाईव्ह आली होती. ती व्हिडीओ तयार करताना ‘एज फिल्टर’ वापरायची. त्यादिवशी पण नेहमीप्रमाणे तिने ‘एज फिल्टर’ लावला होता, पण मध्येच टेक्निकल बिघाडामुळे तिचं खरं रूप समोर आलं. ही तरुण मुलगी खरं तर तरुण नसून ५८ वर्षांची बाई आहे हे लोकांना समजलं. तिच्या दुर्दैवाने फिल्टरने तिला दगा दिला.

मंडळी, तिचे पुरुष चाहते तिच्यावर भलतेच चिडलेत. तिने स्वतःची ओळख लपवली म्हणून नाही, तर तिने त्यांचे पैसे खाल्ले म्हणून. तिच्या चाहत्यांना माहित झालं होतं की ती फिल्टर वापरते, त्यांनी तिला फिल्टर काढायला सांगितलं, पण या बयेने उलट म्हटलं की “मला जोवर १ लाख युवानचे गिफ्ट मिळत नाहीत तोवर मी माझं खरं रूप दाखवणार नाही. तशी मी आहेच मुळात देखणी” मग काय, तिच्या चाहत्यांनी तिच्या रूपावर भाळून तिला तब्बल १ लाख युवान म्हणजे १० लाख रुपये पाठवले पण.
ती Douyu या व्हिडीओ स्ट्रिमिंग अॅपवर व्हिडीओ पोस्ट करायची. तिचे जवळजवळ ६,५०,००० फॉलोअर्स होते. तिचं खरं रूप समजताच लोकांनी तिला अनफॉलो करायला सुरुवात केली. तिच्यावर Douyu अॅपने बंदी पण आणली आहे

यानिमित्ताने होणाऱ्या चर्चेत दोन गट पडलेत. काही लोक तिच्या प्रेक्षकांनाच दोष देत आहेत. ओळख पटलेली नसून कोणी पैसे कसं पाठवू शकतं असं त्यांना विचारलं जातंय. चीनमध्ये सौंदर्याबद्दल असलेल्या दुतोंडीपणाचाही मुद्दा चर्चेत आहे. दुसरा एक गट अर्थातच तिने खोटं बोलल्याबद्दल तिला दोष देतोय.
मंडळी, तुम्हाला काय वाटतं ? आम्हाला नक्की सांगा.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१