एका बकरीच्या मृत्यूने तब्बल २.७ कोटीचं नुकसान? कसं घडलं हे?

लिस्टिकल
एका बकरीच्या मृत्यूने तब्बल २.७ कोटीचं नुकसान? कसं घडलं हे?

समजा बकरी मेली तर किती नुकसान होऊ शकतं ? जास्तीतजास्त काही हजार रुपयांचं नुकसान होईल. पण एका कोळसा कंपनीला २.७ कोटी इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. कसं ते समजून घेऊया !

कोळशाचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘तालचेर’ येथे ‘महानंदी कोलफिल्ड इंडिया’ कंपनीची खाण आहे. ही कंपनी कोल इंडियाचीच सहाय्यक कंपनी आहे. त्याचं झालं असं, की या कंपनीच्या निषिद्ध ठरवण्यात आलेल्या भागात एक बकरी आली आणि तिथे तिचा अपघाताने मृत्यू झाला.

मंडळी, ही घटना सोमवारी घडली. गावातल्या लोकांना जेव्हा बकरीच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा गावात संताप उसळला. सकाळी ११ च्या सुमारास गावातल्या लोकांनी कोळसाखाणीकडे मोर्चा नेला. बकरीला मारण्याच्या बदल्यात नुकसानभरपाई म्हणून ६०,००० रुपये मागण्यात आले.

पोलीस आणि खाणीच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यावर दुपारी २.३० वाजता लोक आपापल्या घरी निघून गेले. पण तोवर बरंच काही घडलं होतं. कोळसा वाहून नेण्याचा मार्गच अडवण्यात आला होता, त्यामुळे कोळसा वेळेवर पोहोचू शकला नाही. या कारणाने कंपनीला जवळजवळ २.७ कोटी एवढं नुकसान झालं.

मंडळी, कोळसा खाणीची जागा ही निषिद्ध असते. ज्यांना खाणीबद्दल माहिती आहे, जे तिथे काम करतात आणि ज्यांना खाणीजवळ जायचे अधिकार आहेत अशाच माणसांना तिथे येण्याची परवानगी असते. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे तालचेरचे गावकरी खाणीच्या आवारात घुसखोरी करतात, कोळसा चोरी करतातम, तसेच आपली जनावरं चरायला आणतात.

आता या सगळ्या प्रकरणात कोण बरोबर आणि कोण चूक हे आता तुम्हीच ठरवा.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख