आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वीचे हे छायाचित्र आहे. थायंलंड मधले हे नागरीक घरातले असले-नसलेले सर्व सोनं घेऊन बाजारात विकायला आलेले आहेत. कोवीडच्या साथीमुळे नोकर्या गेल्या आहेत, रोजच्या खर्चाची मारामारी आहे, अशा वेळी दुसरं करणार तरी काय ?
सोन्याच्या भावाने उच्चांक गाठलेला आहे. घरातलं सोनं विकून दिवसांचे खर्च भागवू अशा विचाराने लोकांच्या झुंडी सोनाराच्या दुकानात जात आहेत. ही गर्दी काही दिवसांत इतकी वाढली की शेवटी थायलंडच्या पंतप्रधानांनी लोकांना जाहीर आवाहन करून सांगीतले की सोनं विका, पण इतकं विकू नका की दुकानदारांचे पैसेच संपतील.









