एखाद्याची कल्पना चोरणं म्हणजे अब्जावधी रुपयांचा मामला आहे. तसा या विधानावर तुमचा विश्वास बसणार नाही म्हणा... पण आपल्या ओळखीच्या अनेक गोष्टी या चोरीतूनच आलेल्या आहेत. पण मग मूळ कल्पना ज्याची असेल त्याचं काय? तो बिचारा गरीब असेल तर गरीबीतच मरेल. एखादा चिकट लढवय्या असेल, तर तो नुकसान भरपाई मिळवेल! पण त्यापलिकडे काही नाही. या दुनियेचा न्याय असा आहे की शेवटी नफ्याचं डबोलं चोराच्याच हातात राहतं.
आज आम्ही तुम्हाला अशीच एका प्रोफेसरची कथा सांगणार आहोत. या प्रोफेसरची कल्पना चोरून अमेरिकेतल्या आणि युरोपातल्या सगळ्या कार कंपन्यांनी अब्जावधी रुपये कमावले. ही कथा म्हणजे एक सर्वसामान्य माणूस प्रचंड मोठ्या कंपन्यांशी कसा लढा देतो याची स्फूर्तीगाथा आहे आणि असा लढा देणार्या माणसाचं आयुष्य कसं छिन्नविछिन्न होतं हे सांगणारी ट्रॅजेडी पण आहे.
तर, यापूर्वी आम्ही तुम्हांला आयुष्यात कधीही गाडी न चालवलेल्या बाईनं वायपर्सचा शोध कसा लावला याची गोष्ट सांगितली होती. ही गोष्ट आहे इंटरमीटंट विंडशिल्ड वायपर्सच्या शोधाची. आपल्या गाडीच्या काचा पुसणारे वायपर हा काही गाड्या बनवणार्या कंपन्यांनी लावलेला शोध नाही. ही कल्पना आहे रॉबर्ट किर्न्स या एका इंजिनिअरिंग प्रोफेसर!









