नावात काय आहे असं म्हटलं जातं. पण हे वाक्य कुणी म्हटलंय त्या शेक्सपिअरचं नावही तितकंच महत्त्वाचं ठरतं. तसं नाव बदलणं आपल्याला नवीन नाही. बायकांची लग्नानंतर आडनावं सर्रास बदलायची, काही बिचाऱ्यांची तर नावं-आडनावं दोन्ही बदलली जायची. त्यांना सोशल मिडियावर शोधणं सोडा, त्यांच्याकडून फ्रेंड रिक्वेस्टा आल्यावरही आपण "आता या कोण?" म्हणून बुचकळ्यात पडतो. पण काहीजण स्वखुशीनं नावं बदलतात. लहानपणीचं दगड्या-धोंड्या नाव आधुनिक जगात एकदम आउटडेटेड वाटतं तर कधी वेगळंच नाव आवडतं, कारणं काहीही असू शकतात.
या दिल्लीकरानं नाव बदलून जेम्स बाँड का ठेवलंय?


एक वेळ होती जेव्हा आपण लहान होतो आणि आपल्या मित्रांना मला शक्तिमान म्हणा, सुपरमॅन म्हणा म्हणून सांगायचो. लहान वयात काल्पनिक पात्रं पण खरीच वाटायची म्हणून त्याच्यावर प्रेम पण खऱ्या माणसासारखंच केलं जायचं. दिल्लीतल्या एका तरुणाने पण हेच केले आहे. गडी जेम्स बॉण्डच्या पात्रापासून एवढा प्रभावित झाला की त्याने चक्क स्वतःचे नाव बदलून जेम्स बॉण्ड करून घेतलं आहे.
पश्चिम दिल्लीत राहणाऱ्या 33 वर्षांच्या विकास कर्दम याची ही गोष्ट आहे. नाव बदलल्यापासून भाऊ चांगलाच फेमस झाला आहे. तो म्हणतो, "नाव बदलल्यापासून अनेक लोक मला ओळखायला लागले आहेत. ही गोष्ट अनेकांना गंमत वाटतेय, पण हे खरंच घडलंय."

विकास जेम्स बॉण्डच्या पात्रापासून खूपच जास्त प्रभावित झाला आहे. म्हणूनच त्याने हे पात्र त्याच्या खऱ्या जीवनात उतरवायचे ठरवले आहे. मात्र या गोष्टीमुळे त्याच्या घरात भांडणं चालू झाली आहेत. त्याची बायको त्याच्या या निर्णयाने नाराज झाली आहे. तिला आपल्या नवऱ्याची थट्टा होईल असे वाटते पण विकासराव आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
सुरवातीला हे नाव बदलण्याचं प्रकरण कोणी गांभीर्यानं घेत नव्हते. पण भावाने हार नाही मानली. नाव बद्दलण्याआधी ऑफिसमधील सहकाऱ्यांशी चर्चा केल्याचे तो सांगतो. त्याच्या म्हणण्यानुसार आधीच नाव बदलले असते, पण कोरोना घुसला आणि गोष्ट रखडली. कोरोनामुळे झालेल्या नुकसानीत हे पण एक मोठे नुकसान मोजायला हवे, नाही का?
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१