घड्याळाचं भूत मानगुटीवर बसवून घेतेलेले मुंबईकर आजूबाजूला न बघताच रोज अनेक ऐतिहासिक वास्तुंसमोरून येतजात असतात. कधीकधी बराच वेळ हाताशी असताना रमतगमत निघाल्यावर एखादी जुनी वास्तू खुणावते आणि मग थोडी शोधाशोध केली तर त्या वास्तूबद्दल अनेक मनोरंजक किस्से आणि कहाण्या उलगडून समोर येतात. अशीच एक वास्तू आहे ‘धनराज महल’!
गेट वे ऑफ इंडिया बघायला गेल्यानंतर आपण एका टोकाला असलेला गेट वे ऑफ इंडिया आणि दुसऱ्या टोकाला असलेलं ताजमहाल हॉटेल इतकंच बघतो, पण तिसरं टोक आपण फारसं बघतही नाही. हे तिसरं टोक म्हणजेच ‘धनराज महल’.









