अमेरिकेची अंतराळ संशोधन करणारी संस्था नासा (NASA) ने नुकतीच एक मोहीम यशस्वी केली आहे. मंगळावर परसिव्हीअरन्स (Perseverance) ही गाडी उतरवण्यात त्यांना यश आले आहे. सगळ्यात विशेष म्हणजे या गाडीचे नेतृत्व एक भारतीय अमेरिकी महिलेने केले आहे. त्यांचे नाव डॉ. स्वाती मोहन असे आहे. शुक्रवारी अतिशय उत्कंठा वाढवणाऱ्या वातावरणात ही अत्याधुनिक रोव्हर गाडी मंगळवर उतरली. आतापर्यंतची ही सर्वात प्रगत (ऍडव्हान्स) गाडी आहे. मंगळावरील सूक्ष्म जीवसृष्टीचा शोध घेण्याचे काम ही गाडी करणार आहे. डॉ.स्वाती मोहन यांनी केलेल्या कामगिरीबद्दल जगभर त्यांचे कौतुक होत आहे.
नासाची मंगळ मोहीम यशस्वी करण्यामागे असलेली ही भारतीय शास्त्रज्ञ कोण आहे?


स्वाती मोहन या कोण आहेत?
नासाच्या शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन ह्या भारतीय-अमेरिकन वैज्ञानिक आहेत. अवघ्या एक वर्षाच्या असताना त्या भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. त्यांचे बालपण उत्तर व्हर्जिनिया-वॉशिंग्टन डीसी भागात गेले. वयाच्या ९ वर्षी त्यांनी 'स्टार ट्रेक' मालिका पहिली त्यावेळी त्यांना अंतराळावीर व्हावेसे वाटले. नंतर वयाच्या १६व्या वर्षापर्यंत बालरोगतज्ञ व्हायचे होते. पण नंतर त्यांनी इंजिनीअर बनून अंतराळ संशोधन करण्याचा निर्धार केला.
कॉर्नेल विद्यापीठातून मेकॅनिकल अँड एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये त्यांनी बीएससी आणि एरोनॉटिक्स, अॅस्ट्रोनॉटिक्समध्ये एमआयटी आणि पीएचडी केली आहे. स्वाती सुरुवातीपासूनच नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत मार्स रोव्हर मिशनच्या सदस्य आहेत. नासाच्या कॅसिनी (शनीचे मिशन) आणि ग्रेल (चंद्राकडे उड्डाण करणारे हवाई परिवहन) सारख्या महत्त्वपूर्ण अभियानामध्ये त्यांनी महत्वाची कामगिरीे बजावली आहे. २०१३-२०२० त्या मंगळ अभियानामध्ये काम करत आहेत. सध्या त्या नेव्हिगेशन आणि कंट्रोल ऑपरेशन्सचे नेतृत्व करत आहेत.

मोहीम काय आहे?
ही मंगळावरची मोहीम गेल्यावर्षी ३० जुलैला सुरू झाली होती! फ्लोरिडातील केप कॅनव्हरोल येथल्या अवकाशयानातून ही गाडी पाठवण्यात आली होती. सात महिन्यांच्या प्रवासानंतर ही गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर सुरक्षित उतरली असून जेझेरो विवरात ती अलगद उतरली आहे. नासाने या अवकाशमोहिमेमुळे इतिहासात एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.
अवकाशात अशी गाडी पाठवणे ही पहिलीच वेळ नव्हती. परग्रहावर गाडी उतरवण्याचे काम अतिशय कौशल्याने करावे लागते. एखादी बारीक चूकही पूर्ण मोहीम बाद करू शकते. ही गाडी मंगळावरचे नमुने गोळा करून पृथ्वीवर पाठवणार आहे. परसिव्हीअरन्सने पाठवलेले मंगळाच्या पृष्ठभागाचे पहिले छायाचित्रही पाठवले आहे. त्याचा फोटो नुकताच नासाने पोस्ट केला आहे.

या मोहिमेसाठी डॉ.स्वाती मोहन यांचे जगभर कौतुक होत आहे. परसिव्हीअरन्सचे मंगळाच्या पृष्ठभागावर झालेले यशस्वी लाँडिंग हे स्वाती यांनी अतिशय कौशल्याने केले. रोव्हर पृष्ठभागावर उतरवण्याचा काळ मोहिमेतला सर्वांत थरारक काळ मानला जातो. स्वाती मोहन यांनी पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ही मोहीम यशस्वी करून दाखवली.
डॉ.स्वाती मोहन यांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीने भारतीयांचीही मान उंचावली आहे हे निश्चित. बोभाटातर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन.
लेखिका: शीतल दरंदळे
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१