१.५ कोटी डॉलर्सचा ड्रेस तरी तिसऱ्या क्रमांकावर? मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे पाहा !!

लिस्टिकल
१.५ कोटी डॉलर्सचा ड्रेस तरी तिसऱ्या क्रमांकावर? मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे पाहा !!

तुम्ही कधी डोळे दिपवणारे कपडे पाहिले आहेत का? पाहिले नसतील तर आज नक्की पाहाल. पॅरिसमध्ये दरवर्षी फॅशनच्या जगात नावाजलेला ‘पॅरिस फॅशन वीक’ भरवला जातो. २०२० सालचा कार्यक्रम हा खास ठरला, कारण कार्यक्रमाच्या शेवटी नववधूच्या अत्यंत महागड्या ड्रेसचं अनावरण झालं. हा पाहा तो ड्रेस.

या ड्रेसची किंमत आहे तब्बल १.५ कोटी डॉलर्स. भारतीय चलनात नेमकं किती हे आता तुम्हीच तपासा. हा ड्रेस जर तुम्हाला महागडा वाटत असेल तर थांबा. हा ड्रेस जगात केवळ तिसऱ्या स्थानावर आहे.

इजिप्तच्या ‘हॅनी एल बेहेरी’ या फॅशन ब्रँडने २०१९ साली या ड्रेसची निर्मिती केली. २३ डिसेंबरच्या कैरो येथील कार्यक्रमात या ड्रेसचं अनावरण करण्यात आलं होतं. लवकरच हा ड्रेस इजिप्तच्या एका अब्जाधीशाच्या मुलीच्या लग्नासाठी पाठवण्यात येणार आहे. तो पाठवण्यापूर्वी फॅशन वीकमध्ये त्याची एक झलक दाखवण्यात आली. 

काय खास आहे या ड्रेसमध्ये ?

काय खास आहे या ड्रेसमध्ये ?

अत्यंत महागड्या अशा आयव्हरी ट्यूल कापड आणि तलम रेशमी कापड वापरुन हा ड्रेस तयार करण्यात आला आहे. सजावटीसाठी संपूर्ण ड्रेसवर हिरे आणि रत्नं जडवण्यात आली आहेत. ८०० डिझाईनर्सनी मेहनतीने हा कलेचा नमुना तयार केला आहे.

जगातलं सर्वात महागडं ड्रेस कोणता ?

जगातलं सर्वात महागडं ड्रेस कोणता ?

(Nightingale of Kuala Lumpur)

पहिला क्रमांक लागतो मलेशियन डिझाईनरने तयार केलेल्या ड्रेसचा. या ड्रेसला 'Nightingale of Kuala Lumpur' म्हणतात. त्याची किंमत तब्बल ३ कोटी डॉलर्स एवढी आहे. 'Nightingale of Kuala Lumpurला तयार करण्यासाठी शिफॉन आणि रेशमी कापडाचा वापर करण्यात आला होता. या ड्रेसचा रंग गडद लाल आहे. २००९ सालच्या ‘स्टाईलो फॅशन ग्रँड प्रिक्स केएल’ मध्ये या ड्रेसचं अनावरण करण्यात आलं होतं. 

दुसरा क्रमांक लागतो तो अबाया नावाच्या ड्रेसचा. ब्रिटिश डिझाईनर डेबी विंगहॅम यांनी ‘अबाया’ डिझाईन केला आहे. या ड्रेसची किंमत १.७७ कोटी डॉलर्स एवढी आहे.

(अबाया)

वास्तविक पाहाता अबाया म्हणजे अरेबिक देशांत वापरला जाणारा एकप्रकारचा बुरखा, पण इथे या डिझायनरने या शब्दाला वेगळाच अर्थ प्राप्त करुन दिला आहे. अबायाला सजवण्यासाठी तब्बल ३००० रत्नं वापरण्यात आले आहेत. शिवाय २ कॅरेटचे ५० काळे हिरे आणि ५० पांढरे हिरे आहेत. इतर लहानमोठ्या हिऱ्यांची संख्या ही १८९९ एवढी आहे. या ड्रेसमध्ये १००० माणिकं वापरण्यात आली असून काही ठिकाणी अस्सल सोन्याची कलाकुसरही आहे.

तर, कसे वाटले हे डोळे दिपवणारे कपडे ?

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख