आजवरच्या मानवी इतिहासात फक्त दोन लोक एचआयव्ही-एड्स् या जीवघेण्या आजारातून बरे झाले आहेत. त्यातल्या दुसऱ्या रुग्णाला बरे करणारे रविंद्र गुप्ता यांच्याबद्दल नुकतीच टाईमने त्यांच्या मासिकात माहिती दिली आहे. याआधी २००८साली देखील एक रुग्ण एचआयव्हीपासून बरा झाला होता.
एचआयव्हीपासून मुक्त झालेला जगातला पहिला माणूस...मात्र त्याचा या आजाराने घात केला!!


एचआयव्ही-एड्स या रोगातून बरा झालेला तो रुग्ण 'बर्लिन पेशन्ट' या नावाने प्रसिद्ध आहे. पण त्याचं खरं नाव टिमोथी रे ब्राऊन. २००८मध्ये हा टिमोथी बरा झाल्याचे एका परिषदेत जाहिर करण्यात आले होते. या परिषदेत रुग्णाची ओळख लपवण्यासाठी त्याला बर्लिन पेशंट असं सांकेतिक नाव देण्यात आलं होतं. २०१०मध्ये त्याने आपली खरी ओळख जाहिर केली होती. या टिमोथीला दुसऱ्यांदा कॅन्सर झाला होता. त्यातूनच त्याचा मृत्यू ओढवला. एचआयव्हीला हरवले, पण कॅन्सरने घात केला असं त्याच्याबद्दल म्हणायला हरकत नाही.
१९६६ साली जन्मलेल्या टिमोथीला १९९५ मध्ये एचआयव्हीचे निदान झाले होते. २००७ साली एचआयव्हीसोबत दीर्घ लढा देऊन त्याने या रोगाला हरविले होते. या घटनेमुळे हा रोग आटोक्यात येईल आत्मविश्वास संशोधकांना आणि सर्वसामान्य माणसालाही निर्माण झाला होता.

२००६ साली त्यांना ल्युकेमिया नावाचा कॅन्सर असल्याचे समजले. एकाच वेळी त्याला आता कॅन्सर आणि एचआयव्ही सोबत लढा द्यावा लागला होता. त्याने यापासून बरे होण्यासाठी दोन वेळा बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले. या दरम्यान अनेक त्रासदायक उपचारालाही सामोरे जावे लागले होते. पण त्याची इच्छाशक्ती दांडगी होती. मात्र इतकी वर्षे कॅन्सरसोबत लढा दिल्यानंतर वयाच्या ५४व्या वर्षी टिमोथीचा मृत्यू झाला आहे.
आणखी वाचा :
बोनमॅरो ट्रान्सप्लांट काय आहे आणि या ट्रान्सप्लांटने HIV कसा बरा होतो ??
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१