आजच्या डिजिटल युगात आपल्यातले बरेचजण बँकेचे व्यवहार फोन द्वारे करत असतात. ऑनलाईन व्यवहारा सोप्पा असल्याने तो चलतीत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन चोरट्यांनी आपल्या बँक अकाऊंटवर दरोडा टाकण्याचा नवीन मार्ग शोधून काढलाय.
मंडळी, सध्या चोरटे एका अॅपद्वारे लोकांच्या मोबाईल मध्ये शिरण्याचा प्रयत्नात आहेत. या अॅपचं नाव आहे – AnyDesk.
३. हे तथाकथित बँकेचे कर्मचारी खरे आहेत यावर आपला विश्वास बसावा म्हणून ते आपली माहिती तपासण्याचं नाटक करतात. जसे की नाव, जन्म तारीख, पत्ता, फोन नंबर, वगैरे.
४. एकदा का AnyDesk अॅप डाऊनलोड झालं की अॅपतर्फे बरीच परमिशन्स मागण्यात येतात. या परमिशन्स शिवाय आपल्याला अॅप वापरता येऊ शकत नाही, त्यामुळे आपणही Allow वर क्लिक करतो. पण असं करून आपण आपल्या मोबाईलचा ताबा अॅपकडे सोपवत असतो.