भारतात पावलापावलावर परंपरा बदलतात असं म्हणतात. मग वेगळ्या राज्यात गेल्यावर तर काय होत असेल हे विचारुच नका. काही भागांतल्या परंपरा एवढ्या भन्नाट आहेत की काय सांगावे!! आज आम्ही अशाच एका वेगळ्या सणाबद्दल माहिती देणार आहोत. हो, पटलं नाही तरी हा त्या लोकांसाठी सणच आहे.
तमिळनाडूतल्या गुमातापुरामध्ये "गोरेहब्बा फेस्टिवल" साजरा करण्यात येतो. या सणात लोक चक्क शेण एकमेकांच्या अंगावर फेकण्याचा खेळ खेळतात मंडळी!! म्हणजे 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मध्ये टोमॅटोनो फेस्टिव्हल पाह्यलात ना, अगदी तस्सा समारंभ असतो हा. फक्त ते लोक एकमेकांच्या अंगावर टोमॅटो फेकतात, आणि इथे थेट शेण फेकतात!! आणि हे सगळं होतं दिवाळीतल्या बळीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी.








