मुंबईच्या लोकलचा प्रवास अनेक कारणांनी धोक्याचा आहे, पण काहीवेळा लोक स्वतःहून संकट ओढवून घेतात. उदाहरणार्थ रेल्वे रूळ ओलांडणे, दोन रुळांमधलं कुंपण ओलांडून जाणे. काहीही करून आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याच्या घाईत असे प्रकार घडत असतात. हे रोखण्यासाठी रेल्वे स्थानकावर नेहमीच दर पाच मिनिटाने घोषणा होत असते. तरीही लोक ऐकत नाहीत हे बघून रेल्वे विभागाने आता एक नवीन शक्कल लढवली आहे.
अंधेरी-मालाड स्टेशनवर यमराज काय करतोय ? जाणून घ्या !!


पश्चिम रेल्वे विभागाने लोकांना रेल्वे रूळ ओलांडण्यापासून थांबवण्यासाठी आता थेट यमराजाला पाचारण केलंय. पण हा यमराज लोकांना स्वर्गात न्यायला आलेला नाही. तो प्रवाशांना वाचवायला आलाय. म्हणजे जेव्हा एखादा प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना दिसेल तेव्हा हे यमराज त्या प्रवाशाला उचलून सुरक्षित स्थळी पोचवतील.

हे यमराज म्हणजे यमराजच्या वेशातला माणूस हा रेल्वे संरक्षण दलातील जवान आहे. ६ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या जागरूकता मोहिमेत तो सामील झाला होता. पश्चिम रेल्वेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या लोकांना उद्देशून “जो भी पटरी क्रॉस करेगा उसे उठाही लेके जाऊंगा” म्हणताना दिसतोय.
This Yamraj ji saves lives. He catches people who are endangering their lives by trespassing the railway tracks, but to save them. This Yamraj picks people to release them safely. Please do NOT cross tracks, it's dangerous. pic.twitter.com/PT81eYVajL
— Western Railway (@WesternRly) November 7, 2019
रेल्वे जागरूकता मोहिमेसाठी पश्चिम रेल्वेने अंधेरी आणि मालाड या दोन स्टेशन्सची निवड केली आहे, कारण रेल्वे रूळ ओलांडणे किंवा मधल्या कुंपणावरून उडी टाकणे असे प्रकार या भागात जास्त होतात.
सोशल मिडीयावर हा प्रकार चांगलाचगाजला आहे. तो व्हायरलही होतोय. पश्चिम रेल्वेने ज्या उद्देशाने यमराजला बोलावलंय त्याला या माध्यमातून यश यावं एवढंच वाटतं.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१