गार्डियनने फणसाविषयी असं काय म्हटलं की लोक भडकलेत ??

लिस्टिकल
गार्डियनने फणसाविषयी असं काय म्हटलं की लोक भडकलेत ??

आंब्यांनंतर कोकणात काही प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे फणस. पुलंनी कोकणी माणसाला फणसाची उपमा दिली आहे. बाहेरून काटेरी तर आतून गोड. असा हा फणस सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. युकेच्या The Guardian या वृत्तपत्राने फणसाला “कुरूप आणि दुर्गंधी फळ” म्हटलं आहे. असं एखाद वाक्य असतं तर ठीक राव, संपूर्ण लेखात फणसाला नाय नाय ते बोललेत हे इंग्रज. भारतीय मंडळी कशी गप्प बसतील. ट्विटरवर लोकांनी The Guardian ला चांगलंच झोडपून काढलं आहे.

प्रकरण नेमकं काय आहे ?

प्रकरण नेमकं काय आहे ?

मंडळी, The Guardian ने फणसावर २७ मार्च रोजी एक लेख प्रसिद्ध केला होता. लेखिका आहेत “झो विल्यम्स”. हा लेख सांगतो की कशाप्रकारे शाकाहारी लोकांनी फणस डोक्यावर घेतला आहे. हे सांगत असताना त्यांनी फणसाला नावं ठेवली आहेत. लेखातल्या एका वाक्यात तर म्हटलं आहे की “फणस हे एकेकाळी झाडावर सडत राहणारं फळ होतं पण आता ते मटणाला पर्याय म्हणून खाल्लं जातं”. पुढे तर त्यांनी हे पण म्हटलंय की “लोक फणस खातात कारण त्यांच्याकडे दुसरं काही खाण्यासाठी नसतं”. 

राव लेखात फणसाचा उल्लेख ‘भारतीय फळ’ असा करण्यात आला आहे. हा लेख प्रसिद्ध झाल्यांनतर मात्र आशिया खंडात जिथे जिथे फणस खाल्ला जातो तिथल्या लोकांनी “The Guardian” वर सडकून टीका केली आहे

मंडळी, झो विल्यम्स यांनी फक्त फणसाला नावे ठेवलेली नाहीत तर अगदी भोंगळ मत दिलं आहे. आता हेच बघा ना “फणसाला कोणती टेस्टच नसते” म्हणे. अशी विधानं The Guardian सारख्या वृत्तपत्राला शोभणारी नाहीत राव.

 

 

फणसाविषयी थोडक्यात

फणसाविषयी थोडक्यात

मंडळी, फणस हे भारताच्या दक्षिण पश्चिम भागातलं एक प्रमुख फळ आहे. कोकण किनारपट्टी पासून ते केरळ भागापर्यंत फणस आढळतो. फणस हे केरळचं राज्य फळ आहे. झाडावर आढळणारं सर्वात मोठं फळ म्हणून फणस ओळखला जातो.

भारताखेरीज आशिया खंडातल्या प्रमुख भागात फणस मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. बांगलादेशचं तर ते राष्ट्रीय फळ आहे. श्रीलंका, मलेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हियेतनाम भागात फणस प्रसिद्ध आहे.

मधुमेह, अस्थमा सारख्या आजारांवर फायदेशीर म्हणून पण फणसाचा उपयोग केला जातो. शाकाहारी लोक मांसाला पर्याय म्हणून फणस खातात. हल्ली फणस याच कारणाने प्रसिद्ध झाला आहे. २०१७ साली पिंट्रेस्ट कंपनीने तर फणसाच्या प्रसिद्धीला “one of the hottest food trends of 2017” म्हटलं होतं.

 

राव, इंटरनेटवर एवढी सगळी माहिती उपलब्ध असून पण या लोकांनी फणसाला नावं ठेवली आहेत. या लोकांचं आणि फणसाचं नेमकं काय बिनसलं असावं ? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या !!!

टॅग्स:

bobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobatabobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi news

संबंधित लेख