मंडळी, सरकारी लालबत्तीवाली गाडी म्हणून भारतात अम्बॅसिडरला वेगळाच मान आहे. पूर्वी कार म्हटलं की फक्त अम्बॅसिडर आठवायची. भारतात अम्बॅसिडर सर्वात जास्त विकली जाणारी कार होती. पारसी लोकांचा तर अम्बॅसिडरवर खास जीव.
आपली लाडकी अम्बॅसिडर नव्या रुपात येत आहे....फोटो पाहून घ्या !!


राव, प्रत्येकाची वेळ असते. अम्बॅसिडरचे पण दिवस सरले. २०१७ साली अम्बॅसिडर भारतीय बाजारपेठेतून निघून गेली. पण आज एक आनंदाची बातमी आली आहे. अम्बॅसिडर भारतात पुन्हा पदार्पण करत आहे, पण यावेळी एकदम हटके आणि मॉडर्न लुक मध्ये. अम्बॅसिडरचा नवा अवतार कार प्रेमींना वेड लावेल यात शंका नाही.

आपण जिला अम्बॅसिडर कार म्हणून ओळखतो ती कार “हिंदुस्तान अम्बॅसिडर” कंपनीची होती. २०१७ साली PSA Groupe म्हणजे Peugeot या फ्रेंच कंपनीने ‘अम्बॅसिडर ब्रॅड’ हिंदुस्तान अम्बॅसिडरकडून विकत घेतला. त्यानंतर कारचं उत्पादन थांबलं.
तर, आता Peugeot कंपनी अम्बॅसिडरला एका नव्या अवतारात भारतात आणणार आहे. पण एक ट्विस्ट आहे. नवी अम्बॅसिडर इलेक्ट्रिक कार असणार आहे. डिझाईनचं म्हणाल जुन्या मॉडल्सना नवीन रूप देण्यात आलंय. Peugeot कंपनी अशा इलेक्ट्रिक कार्सची एक संपूर्ण रेंज लाँच करण्याच्या तयारीत आहे. २०२२ नंतर या सर्व कार्स भारतात विक्रीस उपलब्ध होणार आहेत. पहिली अम्बॅसिडर काहीशी हिंदुस्तान मोटारच्या कॉन्टेसा करचं मॉडर्न रूप असेल. ही पाहा पहिली झलक.

मंडळी, हे फक्त भारतापुरतं नाही तर जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये अम्बॅसिडर दिसणार आहे. अम्बॅसिडरच्या नवीन व्हर्जन सोबतच Peugeot कंपनीची भारतातली वाटचाल सुरु होईल.
तर मंडळी, आपली अम्बॅसिडर पुन्हा एकदा रस्त्यावर दिसणार आहे. तुम्हाला काय वाटतं अम्बॅसिडर पुन्हा एकदा तीच जादू दाखवण्यात यशस्वी होईल का ? तुमचं मत नक्की द्या !!
आणखी वाचा :
पूर्वी एवढ्या कमी किमतीत मिळायच्या गाड्या... या किमती बघून चक्कर येईल भौ!!
रोल्स-रॉइसचा लोगो चोरण्याचा प्रयत्न केला तर काय होतं माहित आहे का ? पाहा हा व्हिडीओ !!
टायरचा रंग काळाच का असतो ? कारण माहित आहे का मंडळी ?
ड्रायवर लोकांना असतात हे ८ गैरसमज...पाहा बरं, तुम्हांला यातल्या किती गोष्टी माहीत होत्या...
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१