देशामध्ये कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. बहुप्रतिक्षित असलेले हे लसीकरण टप्याटप्याने देण्यात येत आहे. आता पर्यंत आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धा यांचे लसीकरण झाले आहे. यापुढे ६० वर्षांवरील व्यक्ती आणि ४५ वर्षे वयाच्या गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. १ मार्च पासून या दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
आजच्या लेखातून आपण लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी नाव नोंदणी कशी करावी याची सविस्तर माहिती घेणार आहोत. ही पद्धत पूर्ण समजून घेतल्यानंतर तुम्हीही करून पाहा.








