३० जानेवारी, १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली. आज त्या गोष्टीला ७१ वर्ष पूर्ण होत आहेत. ७१ वर्षानंतरही त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याबद्दलचं गूढ कायम आहे. तसं पाहायला गेलं तर या हत्येचं नाट्य तिथेच उघड झालं पण पडद्यामागे यावेळी काय हालचाली होत्या याबद्दल फारसं कोणाला माहित नाही. मध्यंतरी एक नवीन माहिती समोर आली होती की गांधीजींना ३ नव्हे तर ४ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ही चौथी गोळी कोणाची होती याबद्दल कोणालाही माहिती नाही. गांधी हत्या एकाने केली की अनेकांनी या बद्दल शंका असली तरी ती टाळता आली असती हे त्रिवार सत्य आहे.
१९४७ साली आपण स्वतंत्र झालो, पण त्याचबरोबर भारतीय भूखंडापासून वेगळा करून ‘पाकिस्तान’ या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली होती. यावेळी झालेली फाळणी आणि या फाळणीतून झालेल्या हिंदू मुस्लिमांच्या कत्तली, दंगली, बलात्कार या सगळ्या नरसंहाराला जबाबदार म्हणून महात्मा गांधींकडे बघितलं जात होतं. हा राग निर्वासितांच्या आणि भारतातल्या काही तरुण वर्गाच्या मनात होता.
आज आपण बघणार आहोत जर वेळीच ठोस पावले उचलली असती तर गांधीहत्या कशा प्रकारे रोखता आली असती.














