एका माणसाने आपली कार चोरीला गेली म्हणून पोलिसात तक्रार केली होती, पण खरं तर तो आपली कार पार्किंग मध्ये लावून विसरला होता. २० वर्षानंतर करचा पत्ता लागला. तोवर कार गंजलेली होती.
मंडळी, ही घटना तर तुम्हाला आठवत असेलच. असाच एक नवीन किस्सा आज आम्ही घेऊन आलो आहोत. पण हा किस्सा याही पेक्षा विचित्र आहे.
त्याचं झालं असं, की १२ वर्षांपूर्वी अॅबिगेल थॉमसन हिची अंगठी हरवली होती. या १२ वर्षात तिने अंगठी शोधण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण ती कुठेच सापडली नाही. मग तिने असं गृहीत धरलं की बहुतेक तिची अंगठी घरातून चोरीला गेली आहे.

पण नुकतंच तिला अंगठी चमत्कारासारखी सापडली. एके दिवशी तिला शिंका सुरु झाल्या. नाक पुसण्यासाठी तिने टिश्यू वापरला. शिंक निघून गेल्यानंतर तिने टिश्यूपेपरकडे नीट पाह्यलं तर काय आश्चर्य, टिश्यूपेपरवर अंगठी होती. १२ वर्ष अंगठी तिच्या नाकात होती आणि तिला याचा पत्ताही नव्हता.

अॅबिगेल थॉमसन आज २० वर्षांची आहे. ही अंगठी तिला तिच्या आईने २००७ साली तिच्या वाढदिवशी दिली होती. काही दिवसातच ती हरवली. तिच्या घरी नेहमीच मित्र मैत्रिणी येतजात असत. अॅबिगेलला वाटलं की तिच्या मित्रमंडळापैकी कोणीतरी अंगठी चोरली आहे.
मंडळी, हे कसं घडलं याचा कदाचित तुम्ही आतापर्यंत अंदाज लावला असेल. अॅबिगेलने नाकात बोटे घालताना अंगठी आत अडकली होती. हे मायलेकींनी पण मान्य केलं आहे.

तर मंडळी, यापुढे तर ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ ही म्हण पण फोल ठरते. तुम्ही या गोष्टीला काय म्हणाल ??
आणखी वाचा :
२० वर्षापूर्वी कार पार्किंग मध्ये लावून तो विसरला आणि...वाचा पुढे काय झाले !!




