जगात सर्वात जास्त वापरले जाणारे मॅसेजिंग ऍप जर कुठले असेल तर ते म्हणजे व्हॉट्सअॅॅप!! सध्या व्हॉट्सअॅॅपशिवाय कुणाचेच पान हलत नाही. सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवण्यापासून सुरू होणारा प्रवास रात्री गुड नाईटच्या मेसेजपर्यंत सुरूच असतो. त्यातल्या त्यात व्हॉट्सअॅॅपवर ग्रुप चॅटची सोय असल्याने बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. कॉलेजच्या मित्रांचे ग्रुप, ऑफीसच्या सहकाऱ्यांचे ग्रुप, फॅमिलीचा वेगळा ग्रुप, राजकीय पक्षांचे पण प्रचारासाठी वेगवेगळे ग्रुप असतातच असतात. मंडळी, या व्हाट्सऍपमुळे जगणे खूप सोपे झाले आहे. म्हणजे आधी कसे, एखाद्याला कशाचे निमंत्रण द्यायचे असेल तर प्रत्येकाला कॉल करावा लागायचा. आता ग्रुपमध्ये इंव्हिटेशन मेसेज टाकला म्हणजे काम फत्ते!!
नंबर सेव्ह न करता लोकांना व्हॉट्सअॅॅप ग्रुप मध्ये ऍड कसं करायचं ?? ही सोप्पी ट्रिक शिकून घ्या !!


नाही का? रोजच्या आयुष्यात सध्या व्हॉट्सअॅॅपशिवाय आपलं पानाचा हलत नाही. पण अजूनही काही लोकांना व्हॉट्सअॅॅपचा वापर कसा करायचा हे पूर्णपणे समजत नाही. बरेच जण व्हॉट्सअॅॅप वापरण्याचे शॉर्टकट्स असताना ते वापरतच नाहीत. अनेकांना ग्रुप बनवायची हौस असते. स्वतः चा ग्रुप बनवून ऍडमीन असले की कसली मालकासारखी फिलिंग येते मंडळी!! तर अनेकांना कामानिमित्त ग्रुप बनवायची गरज पडते. आता ग्रुप बनवताना कंपनीने ग्रुपमध्ये प्रत्येकाला ऍड करायची सोय केलेली नाही मंडळी!! तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणाऱ्यांनाच तुम्ही ग्रुपमध्ये ऍड करू शकता.
पण मग कॉन्टॅक्त लिस्टमध्ये नसणाऱ्यांचं काय करायचं? त्यांना मग ग्रुपमध्ये ऍड करता येतच नाही का? काहीजण मग आधी नव्या माणसाचा नंबर मोबाईलमध्ये सेव करतात, कॉन्टॅक्ट लिस्ट अपडेट करतात आणि मग त्याला ग्रुपमध्ये ऍड करतात.

तर मंडळी, एवढी मेहनत घेण्याची गरज नाहीये. एका सोप्या ट्रिकने तुम्ही कुणालाही नंबर सेव्ह न करता तुमच्या कुठल्याही व्हॉट्सअॅॅप ग्रुपमध्ये ऍड करू शकता. तुम्हाला ती ट्रिक जाणून घ्यायची उत्सुकता लागली असेल ना? चला तर मग, कुणालाही तुमच्या व्हॉट्सअॅॅप ग्रुपमध्ये त्यांचा नंबर सेव न करता कसे ऍड करायचे याची सोपी ट्रिक सांगतो.
मंडळी, आता तुमच्या जीवावर पोट भरत आहे म्हटल्यावर कंपनीला तुमची काळजी असणारच ना! तर ही तुमची गैरसोय दूर व्हावी म्हणून कंपनीने नविन फिचर आणले आहे. पण अजून पण कित्येक लोकांना या फिचरबद्दल माहिती नाहीये. तर मंडळी या फिचर साठी सर्वात आधी तुमचे व्हॉट्सअॅॅप अपडेट करा आणि खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

- सर्वात आधी व्हॉट्सअॅॅप ओपन करा
- तुम्हाला नवीन मेम्बर ऍड करायचा आहे तो ग्रुप ओपन करा.
- स्क्रीनच्या टॉप राईट कॉर्नरवर तीन डॉट्स दिसतील त्यावर क्लिक करून मेनू ओपन करा.
- आता ग्रुप इन्फो ऑप्शन ओपन करा.
- आता थोडं खाली स्क्रोल करा आणि invite via link वर टॅप करा.
- आता तुम्हाला एक मेसेज दिसेल ज्यात लिहिले असेल, invite link has been made त्याच्या खाली चार ऑप्शन असतील. सेंड लिंक वाया व्हाट्सएप, कॉपी लिंक, शेयर लिंक आणि रिवोक लिंक.
- आता ज्याला ग्रूपमध्ये ऍड करायचे असेल त्याला ही लिंक फॉरवर्ड करा किंवा कॉपी करून लिंक मॅसेज करा.

आता या इन्वाइट लिंकवर क्लिक करून तुम्ही ज्याला लिंक पाठवाल, तो ग्रूपमध्ये जॉइन होऊ शकतो. पण मंडळी एका गोष्टिची काळजी घ्यायची, जेव्हा तुमचे काम झाले तेव्हा ही लिंक पुन्हा रिवोक करून द्यावी जेणेकरून या लिंकचा ग़ैरवापर करून कुणी अनोळखी व्यक्ति ग्रुप मध्ये जुळायला नको.
मग कशी वाटली तुम्हाला ही माहिती? आमची ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि त्यांना व्हाट्सअँप ग्रुपमध्ये सामावून घ्या..
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१