प्रत्येक क्षणाला जग बदलत आहे ! बदलाला सामोरे जा ! बदल म्हणजेच जीवन ! अशा सतत कानावर पडणार्या सुविचारांना विसरायला लावणार्या काही वस्तू आपण रोज वापरतो. अगदी शंभर वर्षं उलटल्यावरही न बदलता ज्या गोष्टी वापरतो त्यापैकी एक गोष्ट म्हणजे चेन आणि चेनचे रनर !
१८५१ साली इलियास होवे या माणसानी पहिला झिपर बनवला, ४० वर्षांनी व्हाइट्कोंब ज्यूडसन या माणसाने झिपरच्या डिझाइनमध्ये सुधार करून त्याचा प्रचार केला, पण लोकांना काही ती कल्पना जमली नाही. आपण आज वापरतो ती चेन अस्तित्वात आली १९१३ साली! मागच्या कितीतरी वर्षांपासून कुठलाही बदल न होता आपल्या आजच्या पिढीकडे आहे अशी आलेली गोष्ट म्हणजे चेन. आज जाकेट, पॅन्टस, शूज, बॅग्स, तंबू अगदी कुठे कुठे या चेनचा वापर केला जातो.











