पूर्वी बॅंकेत पैसे काढायचे असतील तर लांब रांगेत उभे राहणे हे पक्के असायचे. अडचणीच्या काळात तर हा उशीर आणखीनच तापदायक असायचा. मग ATM कार्ड आले, पैसे काढणे सोपे झाले. जसजसे डिजिटल व्यवहार वाढत आहेत बँकानी ग्राहकांसाठी अनेक नवीन सुविधा आणल्या. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे देशातील चार अग्रगण्य बँकांनी आता ATM मशीन मधून कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा वापर करून देशात कुठूनही आणि कधीही आपल्या खात्यातून पैसे काढणे आता शक्य आहे. स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा,आरबीएल बँक या बँकेच्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध आहे.
आज समजून घेऊ या ही कार्डशिवाय पैसे काढायची सुविधा कशी वापरतात. सुरुवात करूया पासून









