सोशल मिडिया आता आपल्या आयुष्याचा भाग बनून गेलाय. विशेषतः फेसबुक तर आपण सर्रास वापरतो. पण सारं जग जवळ आणणाऱ्या या समाजमाध्यमांवर आपली प्रायव्हसी कितपत सुरक्षित आहे, याचा विचारही आपण करायला हवा. फेसबुकवर आपण शेअर कलेले फोटो, व्हिडिओ, किंवा तत्सम गोष्टी कोणी पाहाव्यात आणि कोणी नको, हे आपण आतापर्यंत प्रायव्हसी सेटिंगच्या माध्यमातून सेट करू शकत होतो. पण ती पध्दत थोडी किचकट होती. आता फेसबुकनं यात एका नव्या फिचरची भर घातलीय. हे फीचर एका क्लिकमध्ये अनोळखी युझर्सपासून आपलं प्रोफाईल सुरक्षित ठेवेल. याचं नाव आहे 'प्रोफाईल लॉक'.
आपलं फेसबुक प्रोफाईल लॉक करा... अनोळखी व्यक्तींपासून सुरक्षित राहा!


याआधी फेसबुकनं 'फ्रोफाईल पिक्चर गार्ड' नावाचं फिचर आणलं होतं. ते वापरुन आपला फेसबुक प्रोफाईल फोटो डाऊनलोड करण्यापासून किंवा त्याचा स्क्रिनशॉट घेण्यापासून रोखता येत होतं. 'प्रोफाईल लॉक' हे त्याचंंच सुधारित रूप आहे. 'प्रोफाईल लॉक' चा पर्याय इनेबल केल्यानंतर तुमचा प्रोफाईल फोटो सर्वांना दिसेल, पण त्यावरती टॅप केल्यानंतर तो उघडणार नाही. म्हणजेच कोणालाही तो मोठा करून पाहाता किंवा डाऊनलोड करता येणार नाही. याबरोबरच तुम्ही अपलोड केलेले अन्य फोटो, टाईमलाईनवरच्या सर्व पोस्टसुध्दा फक्त तुमच्या फ्रेन्डलिस्टमध्ये असणाऱ्या व्यक्तींनाच दिसतील. फ्रेन्डलिस्टमधल्या व्यक्ती वगळता इतरांनी तुमच्या प्रोफाईलला भेट दिल्यास तिथे त्यांना तुमचं प्रोफाईल लॉक असल्याचं दिसेल. जर तुम्हाला सर्वांनाच दिसेल अशी 'पब्लिक पोस्ट' टाकायची असेल तर मात्र तुम्हाला हे 'प्रोफाईल लॉक' काढावं लागेल.

कसं करावं प्रोफाईल लॉक?
1. सर्वात आधी आपल्या प्रोफाईल पेज वर जा.
2. आपल्या नावाखाली उजव्या बाजूला असणाऱ्या तीन टिंबांवर क्लिक करून प्रोफाईल सेटिंग उघडा.
3. इथे तुम्हाला ५व्या क्रमांकावर Lock Profile हा पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक करून तुमचं प्रोफाईल लॉक करा.
आहे ना उपयोगी माहिती? मग आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१