छोटी छोटी गुंतवणूक करून शेअर बाजारातून भरघोस नफा कसा मिळवता येतो ते आपण या आधीच्या लेखात बघितले. अशा प्रकारे गुंतवणूक करणे संपूर्ण जोखीम विरहित आहे असे नाही. पण त्या विषयाकडे जाण्यापूर्वी आज आपण शेअर ब्रोकरची निवड कशी करायची ते बघू या!
ब्रोकरची निवड करताना आपली गरज नेमकी काय आहे हे निश्चित करणे आवश्यक आहे. तुम्ही ट्रेडर आहात की दीर्घ / मध्यम पल्ल्याचे गुंतवणूकदार म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहात हा विचार करा.










