तुम्हाला ३ इडियट्स मधला शेवटचा सिन आठवतो का? ज्यामध्ये व्हायरसच्या मुलीची प्रसूती होते. त्या दृश्यात हॉस्पिटलमध्ये जाता येत नसल्याने रँचो आणि त्याचे मित्र तिथल्या तिथेच व्हॅक्युम क्लीनरच्या सहाय्याने प्रसूती करतात आणि बाळाचा जन्म होतो. या आयडीयामागचा हिरो म्हणजे रँचो आणि त्याचे मित्र कोणतं शिक्षण घेत असतात हे वेगळं सांगायला नकोच. सगळेच IIT इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतात.
हे झालं चित्रपटाचं. पण खऱ्या आयुष्यातही अशा आणीबाणीच्या प्रसंगात शिक्षणाच्या उपयोगातून जीवही वाचवला जाऊ शकतो. असाच प्रसंग खऱ्या आयुष्यातही घडलं होतं. साल होतं २०१८. एका विमान प्रवासात IIT च्या विद्यार्थ्यांने एका मधुमेही व्यक्तीचा प्राण वाचवला आणि तो खऱ्या अर्थाने रँचो बनला. चला पाहूयात नक्की काय घडले?







