काही लिहायला जावे आणि त्याचा संबंध गेल्या सहा-सात महिन्यांच्या लॉकडाऊन सोबत जोडला जातोच. म्हणजे असं आहे बघा, लॉकडाऊनच्या सुरुवातीला फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर दिसणारा ओळखीचा प्रत्येक माणूस पुढच्या तीन महिन्यात 'टेलीग्राम' वर दिसायला लागला. हळूहळू टेलीग्रामवर असणे किती आवश्यक आहे याच्या चर्चा व्हायला लागल्या. टेलीग्रामवर खातं असूनही न वापरणार्या अनेकांना यामुळे जाग आली. आता फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसोबत 'टेलीग्राम' पण अत्यावश्यक यादीत आलं आहे.
आता टेलिग्राम कसं वापरायचं आणि त्याची इतर समाजमाध्यमांशी स्पर्धा हा आजच्या लेखाचा विषय नाही. पण या निमित्ताने ४० कोटी वापरकर्ते असलेल्या टेलीग्रामच्या निर्मार्त्याची कहाणी आम्ही सांगणार आहोत. चला तर वाचू या 'रशियन झुकरबर्ग' या टोपण नावाने ओळखल्या जाणार्या पॉवेल दुरॉवचा जीवनप्रवास ! योगायोग असा की १० ऑक्टोबरला त्याचा वाढदिवसही आहे.
















