नुकतंच जागतिक आरोग्य संस्थेने कोरोना रोगाला pandemic घोषित केलं. याचा आधार घेऊन कदाचित भारतात १२३ वर्ष जुना कायदा लागू होऊ शकतो. काय आहे हा १२३ वर्ष जुना कायदा? तो आजच्या काळातही वापरला जाऊ शकतो का? चला तर जाणून घेऊया.
हा कायद्या १८९७ साली अस्तित्वात आला. या कायद्याला साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ म्हणतात. १८९७ च्या काळात प्लेगची प्रचंड मोठी साथ आली होती. प्लेगाचं निवारण करण्यासाठी त्याकाळी ब्रिटिश सरकारने नवीन कायदा अस्तित्वात आणला. तो कायदा म्हणजेच साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७.








