भारतीय सैन्याने जगातलं पहिलं बुलेटप्रूफ हेल्मेट तयार केलंय...चर्चा तर झालीच पाहिजे !!

लिस्टिकल
भारतीय सैन्याने जगातलं पहिलं बुलेटप्रूफ हेल्मेट तयार केलंय...चर्चा तर झालीच पाहिजे !!

जगातलं पाहिलं बुलेटप्रूफ हेल्मेट तयार करण्याचा मान आपल्या भारताने पटकावला आहे. भारतीय सैन्यातील  मेजर अनुप मिश्रा यांनी हे हेल्मेट तयार केलंय. ज्या रायफलची जगभरात दहशत आहे त्या AK-47 पासून हे हेल्मेट सहज बचाव करू शकतं.

अनुप मिश्रा हे भारतीय सैन्याच्या मिलिटरी इंजिनियरिंग कॉलेजशी जोडलेले आहेत. त्यांनी ‘अभेद्य’ नावाचा प्रकल्प राबवला होता. यापूर्वी त्यांनी स्नायपर रायफलपासून बचाव करेल अशा बुलेटप्रूफ जाकीटची निर्मिती केली होती. त्यानंतर त्यांनी आपलं लक्ष आजवर दुर्लक्षित राहिलेल्या बुलेटप्रूफ हेल्मेटकडे वळवलं आणि अशा प्रकारचं हेल्मेट बनवू शकतो हे जगाला दाखवून दिलं.

मंडळी, भारतीय सैन्याचं मिलिटरी इंजिनियरिंग कॉलेज अशा महत्त्वाच्या प्रकल्पांवर नेहमीच काम करत आलेलं आहे. या प्रकल्पातून ज्या नवनवीन गोष्टी तयार करण्यात आल्या त्या बघितल्या तर थक्क व्हायला होतं. उदाहरणार्थ, भारतीय मिलिटरी इंजिनियरिंगने आणि एका खाजगी कंपनीने मिळून जगातील  सर्वात स्वस्त गनशॉट लोकेटर तयार केलं आहे. या गनशॉट लोकेटरचा वापर करून ४०० मीटरच्या हद्दीतील बुलेटचं अचूक ठिकाण माहित पडू शकतं. याचा वापर करून सैन्याच्या हालचालींना आणखी वेग येऊ शकेल.

तर मंडळी, भारत फक्त सैन्यदलाच्या बाबतीतच नाही तर संशोधनाच्या बाबतीतही पुढे जात आहे ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख