‘गॉर्डन रामसे’च्या बटर चिकनवर का भडकलेत भारतीय नेटकरी ? नेमकं काय घडलंय पाहा !!

‘गॉर्डन रामसे’च्या बटर चिकनवर का भडकलेत भारतीय नेटकरी ? नेमकं काय घडलंय पाहा !!

राव, ‘गॉर्डन रामसे’ हे नाव कधी ऐकलंय का ? हा माणूस प्रसिद्ध शेफ आहे. तो भयंकर तापट आणि त्याच्या अपमानजनक वागणुकीसाठी नेहमीच चर्चेत असतो. आता रामसे म्हटलं की तुम्हाला भयपट बनवणारे रामसे बंधू आठवू शकतात पण त्यांचा आणि या शेफ बुवांचा काहीही संबंध नाही.

तर, या गॉर्डन रामसे यांच्या तापट स्वभावामुळे आजवर अनेक जणांचा उभ्या उभ्या अपमान झाला आहे, पण नुकतंच त्यांना स्वतःला लोकांच्या रागाचा सामना करावा लागला. निमित्त झालं भारतीय ‘बटर चिकन करी’चं. या शेफ बुवांनी टिपटॉप सजवलेल्या बटर चिकनचा फोटो टाकून शायनिंग मारण्याचा प्रयत्न केला पण ते तोंडावर आपटले. हा पाहा त्यांच्या बटर चिकन करीचा फोटो.

मंडळी, यावर नेटकरी म्हणतायत की कुकिंग मधली आपली हुशारी दाखवून टेंभा मिरवणाऱ्या गॉर्डन रामसे यांना नीट चिकन करी जमलेली नाही. अहो तो नान बघा ना, असं वाटत आहे की पांढरा पापड ठेवलाय. हे आता आपल्या भारतीय अस्सल खवय्यांना कसं काय रुचेल. भारतीय ट्विटरवाल्यांनी गॉर्डन रामसे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. चला काही मजेशीर ट्विट्स पाहूया.

 

 

 

 

 

मंडळी, एका ट्विटर युझरने म्हटलंय की ‘माझ्या घरी ये मी तुला अस्सल बटर चिकन खाऊ घालतो’. दुसऱ्याने तर म्हटलंय ‘तू नेहमी दुसऱ्यांना शिकवत असतो, पण आज बटर चिकनने तुला अद्दल घडवली’...

मंडळी, तुम्हाला या बटर चिकन बद्दल काय वाटतं ? शेफ बुवांसाठी दोन शब्द नक्की बोला !!

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख