मालविका अय्यर १३ वर्षांची असताना ग्रेनेडच्या स्फोटात तिने आपले दोन्ही हात गमावले. एवढा मोठा अपघात होऊनही तिने आपली जिद्द मात्र सोडली नाही. तिने आजवर जे काही सध्या केलं आहे ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
आज मालविका अय्यरची कथा सांगण्या मागचं कारण म्हणजे १८ फेब्रुवारी या दिवशी तिचा वाढदिवस असतो. आपल्या वाढदिवशी तिने संयुक्त राष्ट्रासमोर दिलेल्या भाषणातील काही उतारे शेअर केले होते. त्यात तिने स्वतःची जी गोष्ट सांगितली ती तुम्हाला हादरवून तर सोडतेच पण प्रेरणाही देते.







