महाराष्ट्राचा लाडका बर्गर म्हणजे वडापाव. अगदी चमचमीत आणि खिशाला परवडणारा हा लाडका पदार्थ. लोकल टू ग्लोबल पोहोचणाऱ्या या इंडियन बर्गरने फक्त देशभरात नाही, तर इंग्रजांच्या मेन्यूकार्डमध्येही स्थान कमावलं. पंधरा रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत या वन मिल डिशची रेंज आहे. जर तुम्ही मुंबईला गेला आणि वडा पाव खाल्ला नाही, तर हा मुंबई शहराचा एक स्पेशल पदार्थ मिस केला समजा. याच वडापावचीच लोकप्रियता पाहून एका व्यवसायिकाने १०० चौरस फूट ते १०० कोटींचा थक्क करणारा प्रवास केला आहे. आज वाचूया धीरज गुप्ता यांची प्रेरणादायी कहाणी.
जम्बो किंगचा १०० चौरस फूट ते १०० कोटींचा थक्क करणारा प्रवास....वाचा धीरज गुप्ता यांची यशोगाथा !!


धीरज गुप्ता यांचा जम्बो वडापाव मुंबईत खूप लोकप्रिय आहे. साध्या वड्यापेक्षा हा वडा २० टक्के मोठा आहे. म्हणून जम्बो वडा असे नाव ठरले. याच्या शाखा मुंबई, पुणे, इंदूर आणि लखनऊसह इतर शहरांमध्ये आहेत. तसेच सध्या ११४ फ्रँचाइजी आहेत. त्यांचे पुढचे लक्ष्य १८० आउटलेट्सचे आहे. मार्च २०२२ पर्यंत देशभरात हे आउटलेट्स चालू करण्याचे त्यांनी उद्दीष्ट ठेवले आहे.
मॅकडोनाल्डच्या बर्गरच्या लोकप्रियतेमुळे प्रेरित होऊन धीरजने वडा पाव निवडले. जंबोकिंग सुरू करण्यासाठी त्यांनी दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि मालाड रेल्वे स्थानकाबाहेर १०० चौरस फूट जागेत व्यवसाय सुरु केला. तिथे त्यांनी स्वच्छ जागेत बनवलेल्या वडा पाव विक्रीला सुरवात केली. तसेच त्याची चवही बाजारात मिळणाऱ्या वडापावपेक्षा कशी वेगळी आणि चवदार बनेल याचा अभ्यास केला. बाजारात असलेल्या वडा पावच्या तुलनेत हा जंबो वडा पाव आकारात २० टक्के मोठा होता.

धीरज गुप्ता यांचा आधी मिठाई व्यवसाय करण्याचा विचार होता. तिथे त्यांनी २ वर्ष कामही केले. पण तो व्यवसाय अयशस्वी ठरला. आर्थिक नुकसानही झाले. पण मनात असलेली व्यवसाय करण्याची दुर्दम्य इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. अपयशाने खचून न जाता त्यांनी या वडापावच्या व्यवसायात उडी घ्यायची ठरवली. हळूहळू जम्बो वडापावला लोकप्रियता मिळू लागली. त्यांचे यश पाहून अनेक जणांनी कॉपी करत वेगवेगळ्या नावाने जम्बो वडापाव आणले. तेव्हा धीरज यांनी फ्रँचाइजी देण्यास सुरुवात केली आणि आऊटलेट्स वाढवले.
आता जंबोकिंगमध्ये सेझवान जंबोकिंग आणि छोले जंबोकिंग हे प्रकार आहेत. त्यासहित तिथे बऱ्याच नवनवीन चटपटीत पदार्थांची रेलचेल असते. जसे की टँजी मेक्सिकन, कॉर्न पालक, नाचोस, चीज ग्रील्ड, बिग क्रंच, तंदुरी पनीर आणि क्रिस्पी वेज. तसेच बर्गरचेही प्रकार मिळतात जसे मॅक आणि चीज बर्गर. त्यासह आईस्क्रीम, मिल्क शेक, आणि फ्रेंच फ्राइस देखील येथे मिळतात.

धीरजने यशाचे गुपित विचारल्यावर संगितले की, ग्लोबल क्यूएसआर जायंट्सच्या बिझिनेस मॉडेल्सचे निरीक्षण करून त्यांनी त्याचा वापर केला. तसेच पदार्थांची गुणवत्ता टिकवणे याकडेही लक्ष दिले. पर्याय वाढवण्याऐवजी एका पाककृतीवर प्रयत्न करून सुधारणा करणे जास्त गरजेचे आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय बुडले. संकटाचा काळ सरल्यानंतर जम्बोकिंग नव्या जोमाने व्यवसाय परत सुरु केला आहे. खवय्यांची पावलं परत जम्बो वडापावकडे वळू लागली आहेत. त्यांचे पुढचे प्लॅनही यशस्वी होतील यासाठी त्यांना शुभेच्छा.
धीरज गुप्ता यांची कहाणी ही खरंच अनेक नवव्यवसायिकांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
लेखिका: शीतल दरंदळे
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१