मुलाने मुलीला प्रपोज करण्यासाठी शोधली भन्नाट आयडिया....झाली गिनीज बुक मध्ये नोंद !!

लिस्टिकल
मुलाने मुलीला प्रपोज करण्यासाठी शोधली भन्नाट आयडिया....झाली गिनीज बुक मध्ये नोंद !!

मुलीला प्रपोज करण्यासाठी मुलं वेगवेगळी शक्कल लढवत असतात. त्यासठी आयडिया पण भन्नाट शोधल्या जातात. आता हेच बघा ना, चीन मधल्या एका मुलाने मुलीच्या वयानुसार २५ आयफोन्स तिला गिफ्ट केले होते. सुदैवाने मुलीने होकार दिला. हे आयफोन्सनंतर त्यांना मदत करणाऱ्या मित्रांना वाटण्यात आले. आणखी एका घटनेत एका मुलाने ऐन बास्केटबॉल सामन्यात चिअरलीडरला प्रपोज केलं होतं. हा व्हिडीओ नंतर व्हायरल झाला होता.

आज आम्ही अशाच एका प्रपोजची गोष्ट सांगणार आहोत. या मुलाने प्रपोज करण्यासाठी जी आयडिया वापरली त्या आयडियाने तर त्याचं नाव चक्क गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलं गेलंय भाऊ. काय आहे ती आयडिया ? चला पाहू.

गोष्ट आहे जपानची. मुलाचं नाव आहे यास्सन. त्याला ११ वर्षापूर्वी एक मुलगी भेटली होती. पुढे तो तिच्या प्रेमात पडला. गेल्यावर्षी त्याने तिला प्रपोज करायचं ठरवलं होतं. पण आपल्या प्रेमाचा इजहार करण्यासाठी त्याने एक आगळीवेगळी आयडिया शोधून काढली.

त्याने जवळजवळ ६ महिने जपानचा प्रवास केला. हा प्रवास पण एका खास पद्धतीने होता. त्याने “Marry Me” या अक्षरात प्रवास केला आहे. जपानच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत असा त्याने जवळजवळ ७१६३ किलोमीटर पर्यंतचा प्रवास केला. प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्याने ही भेट मुली समोर ठेवली आणि तिला प्रपोज केलं. मुलीने तत्काळ होकार दिला राव.

यास्सनच्या कामगिरीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आजवरचं सगळ्यात मोठं GPS drawing म्हटलं आहे. त्याचं नाव आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कायमचं नोंदवलं गेलंय. एवढंच नाही तर गुगलवाने याची दखल घेऊन यास्सनचा प्रवास ट्विटरवर शेअर केला आहे.

 

GPS Art काय आहे ?

GPS Art काय आहे ?

यास्सनने जे केलं त्याला म्हणतात GPS Art. GPS डिव्हाईसचा वापर करून आपण अशा पद्धतीची कलाकारी तयार करू शकतो. यासाठी आधी प्रवासाचा मार्ग ठरवावा लागतो. मग प्रवासात GPS ऑन ठेवून सगळा प्रवास रेकॉर्ड करायचा. प्रवास पूर्ण झाल्यावर आपल्या प्रवासाचा मार्ग ‘गुगल अर्थ’ वर अपलोड केल्यानंतर आपल्या समोर या प्रकारचं चित्र तयार होतं.

तर मंडळी, कशी वाटली ही भन्नाट आयडिया ? तुम्हाला असं काही करायला आवडेल का ??

टॅग्स:

bobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobatabobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi news

संबंधित लेख