पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँक - एच.डी.आय.एल - डि.एच.एफ.एल. या घोटाळ्यांच्या बातम्या शिळ्या होत आहेत तोपर्यंत आणखी एका घोटाळ्याची बातमी आता पुढे आली आहे. या नव्या २८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे मालक आहेत कार्वी शेअर ब्रोकर्स. ही आहे हैद्राबादची एक नावाजलेली कंपनी!!
या घोटाळ्याची व्याप्ती आता दिसतेय त्याहून बरीच मोठी असण्याची शक्यता आहे. हा घोटाळा शेअरबाजारात भाग घेणार्या लोकांपुरता मर्यादीत असल्यामुळे इतर घोटाळ्यांसारखा गवगवा अजूनही माध्यमांद्वारे झालेला नाही. पण भांडवली बाजारात नियंत्रणात्मक काम करणार्या सेबीचा गलथानपणा या प्रकरणाने पुन्हा एकदा प्रकाशात आलेला आहे. आज जाणून घेऊ या काय आहे हा लोच्या आणि जर एकूण फसलेल्या ९०००० गुंतवणूकदारात आपणही असाल तर तर बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे?












