आज आम्ही एका देशभक्त चोराची गोष्ट सांगणार आहोत. हा देशभक्त चोर चोरी करण्यासाठी एका सैनिकाच्या घरात घुसला होता. त्याला जेव्हा समजलं की हे घर एका सैनिकाचं आहे तेव्हा त्याच्यातला देशभक्त जागा झाला. त्याने भिंतीवर आपला माफीनामा लिहून काढला. नेमकं काय घडलं वाचूया.
गोष्ट कोचीच्या थिरूवन्कुलूम भागातली आहे. बुधवारी या भागातल्या एका घरात चोर शिरला होता. घरात कपाटात त्याला सैन्याधिकाऱ्याची टोपी आणि गणवेश दिसला. त्याला समजलं की आपण एका सैनिकाच्या घरात शिरलो आहोत. मुळात देशभक्त असल्याने त्याला वाईट वाटलं.






