सोनभद्र हा भारतातला एकमेव जिल्हा आहे ज्याच्या सीमा ४ वेगवेगळ्या राज्यांशी जोडलेल्या आहेत. पश्चिमेला मध्यप्रदेश तर दक्षिणेला छत्तीसगड, पूर्वेला बिहार आणि आग्नेयला झारखंड आहे. या भागात नक्षलवादी मोठ्याप्रमाणात आहेत. हा भाग तसा आजवर नक्षलग्रस्त म्हणूनच ओळखला जात होता.
तर, यानिमित्ताने आपण ‘वेड्यांचं सोनं’ हेही थोडक्यात जाणून घेऊया. पायराईट या खानिजला ‘वेड्यांचं सोनं’ म्हटलं जातं. पायराईट हे दिसायला सोन्या सारखंच असतं, पण ते लोह आणि सल्फर (गंधक) यांच्या मिश्रणातून तयार झालेलं असतं. दिसायला पितळेसारखं पण त्याला एक चमक असल्याने बघणारा त्याला सोनं समजतो. पायराईटला सोनं समजून फसलेल्या लोकांची अनेक उदाहरणं सापडतात.