भलं करा, भलं होईल... अंध व्यक्तीला मदत करणाऱ्या बाईंना मिळाली अनमोल भेट!!

भलं करा, भलं होईल... अंध व्यक्तीला मदत करणाऱ्या बाईंना मिळाली अनमोल भेट!!

एका अंध व्यक्तीसाठी बस थांबवणाऱ्या महिलेचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. तुम्हीही तो पाहिला असेल. लाल साडीतल्या बाईंनी धावत जाऊन बस थांबवली आणि नंतर पुन्हा मागे जाऊन अंध व्यक्तीला बसपर्यंत सुखरूप पोचवलं.

हा व्हिडीओ पोलीस ऑफिसर विजय कुमार यांनी ८ जुलै रोजी पोस्ट केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो जवळजवळ १९ लाख लोकांनी बघितला. लोकांनी त्या बाईचं कौतुक केलं. असं म्हणतात की चांगलं काम कधी वाया जात नाही. या बाईंसोबतही हेच घडलं.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याबद्दल माहिती मिळाली की त्याचं नाव सुप्रिया आहे, त्या भाड्याच्या घरात राहतात. एका कापडाच्या दुकानात गेल्या ३ वर्षापासून त्या नोकरी करतात. एकदा दुकानाबाहेर उभ्या असताना त्यांना एक अंध व्यक्ती दिसली आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता जे केलं ते तुम्ही बघतच आहात.

ही माहिती आणि व्हिडीओ प्रसिद्ध ज्वेलरी शॉप 'Joyallukas चे चेअरमन जॉय अलुकास यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी सुप्रिया यांच्या घरी जाऊन त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना हेडऑफिसला येण्याची विनंती केली. हेडऑफिसला पोचल्यानंतर सुप्रिया यांना धक्का बसला. जॉय अलुकास यांनी त्यांना एक नवीन घर भेट दिलं होतं.

सुप्रिया म्हणतात की, " असं काही होईल याचा मी विचारही केला नव्हता. माझ्याकडून हे अनावधानाने घडून गेलं." त्यांच्या कामाकडे बघितल्यास फळाची चिंता न करता कर्म करत राहा या वाक्याची वारंवार आठवण होते.

याबद्दल बोभाटाच्या वाचकांचं काय म्हणणं आहे? आम्हाला कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा!!

टॅग्स:

bobhata newsBobhatabobhata marathimarathi news

संबंधित लेख