मंडळी, जाहिरात म्हणजे तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय. आपण दिवसभरात असंख्य जाहिराती बघत असतो. त्यातल्या गाजलेल्या कित्येक लक्षात राहतात आणि कित्येक विसरल्याही जातात. पण लक्षात राहिलेल्या जाहिरातींनी आपल्या मनावर केलेला परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो. आठवा बरं अश्या कोणत्या जाहिराती आहेत? चला आम्ही काही ओळी देतो आणि तुम्ही ती कोणत्या प्रॉडक्टची जाहिरात होती हे ओळखा…
'हर एक फ्रेंड जरुरी होता है…'
'हम में है हिरो…'
'नये भारत की बुलंद तसवीर…'
'कर्रम कुर्रम कर्रम कुर्रम'
'प्यार की राह में चलना सीखा'
काय मंडळी? फक्त या ओळी वाचल्या तरी तुम्हाला त्या कुठल्या प्रॉडक्टच्या जाहिरातीत होत्या ते आठवलं असेल. किंबहुना ती अख्खी जाहिरातच डोळ्यासमोर आली असेल. खरं ना? हीच तर ताकद असते जाहिरातींची!















