भेटा भारतीय नौदलातील पहिल्या महिला पायलटला !!

लिस्टिकल
भेटा भारतीय नौदलातील पहिल्या महिला पायलटला !!

भारतात सध्या स्त्री पर्व सुरू आहे. महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. हळूहळू प्रत्येक क्षेत्र महिलांनी आपल्या कर्तृत्वाने व्यापायला सुरुवात केली आहे. अजून एका महिलेने नविन पराक्रम गाजवला आहे. 

भारतीय नेव्हीतील पहिल्या महिला पायलट ठरलेल्या लेफ्टनंट शिवानी या इंडियन नेव्हीकडून कोची येथे 2 डिसेंबरला घेण्यात येणाऱ्या नविन ऑपरेशनमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.  

मूळच्या बिहारमधील मुजफ्फरपूर च्या असणाऱ्या शिवानी इंडियन नेव्हीमध्ये एसएससी पायलट म्हणून इंडियन नेव्हल अकॅडमीच्या 27 NOC कोर्सच्या सदस्य म्हणून समाविष्ट झाल्या होत्या. व्हॉइस ऍडमिरल ए के चावला यांनी शिवानी इंडियन नेव्हीत अधिकृत समाविष्ट झाल्याची घोषणा जून 2018 मध्ये केली होती. 

कोची येथील साऊथर्न नेव्हल कमांडची एक ट्रेनिंग पूर्ण केल्यावर शिवानीला एयरक्राफ्ट उडविण्याची रीतसर परवानगी मिळणार आहे. 

मंडळी, आजवर नेव्हीत महिला होत्या पण थेट एअरक्राफ्ट उडवण्याचा मान शिवानी यांना मिळणार आहे. त्याआधी त्याना खडतर ट्रेनिंगमधून जावे लागणार आहे. भारतासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

 

लेखक : वैभव पाटील.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख