मुंबईतआणि ठाण्यात जवळजवळ सगळीकडेच मेट्रोचं काम चालू आहे. नागरिकांना अजूनही समजलेलं नाही की मुंबई मेट्रोचं जाळं नेमकं कसं असेल. नुकतंच ‘एमएमआरडीए’ ने (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) मेट्रोच्या कामाचा आढावा देणारा एक नकाशा जाहीर केलं आहे. या नकाशावरून मुंबई मेट्रोच्या संपूर्ण जाळ्याची माहिती मिळते.
या नकाशात पहिल्यांदाच मुंबई मेट्रोच्या मार्गीकांना रंग देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, दहिसर आणि डी एन नगर भागांना जोडणाऱ्या मार्गिकेला पिवळा रंग, तर अंधेरी आणि मीरा-भाईंदर भागांना जोडणाऱ्या मार्गिकेला लाल रंग देण्यात आला आहे.










