हिंदी सिनेमा गाजवणाऱ्या अनेक मंडळींनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या संस्थेमधून अभिनयाचे धडे घेतले आहेत. नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, अनुपम खेर, नावाजुद्दिन सिद्दिकी, पंकज त्रिपाठी अशी काही गाजलेली नावं सहज घेता येतील. जाने भी दो यारों, मंडी, बधाई हो, शुभमंगल ज्यादा सावधान या चित्रपटातून झळकलेल्या नीना गुप्ता या देखील याच संस्थेच्या विद्यार्थिनी. त्यांनी १९८० साली एनएसडी मधून शिक्षण पूर्ण केलं. नुकतंच त्यांनी आपल्या एनएसडीच्या दिवसांना उजाळा देण्यासाठी त्यांच्या सहकालाकारांचे फोटो शेअर केले होते.
आज हे अभिनेते-अभिनेत्री यशस्वी तर आहेतच पण दिग्गज म्हणून ओळखले जातात. चला तर त्याकाळी हे कलाकार कसे दिसायचे ते पाहूया. फोटो खाली नाव दिलेलं आहे, पण ते न पाहता तुम्हाला ओळखता येतं का पाहा.











