आंबा हा फळांचा राजा समजला जातो तर आंब्यांच्या प्रजातीत हापूस हा सर्वोच्च पदावर आहे. पण किमतीच्या बाबतीत हापूस हा बराच मागे पडतो. भारतात असे दोन प्रकारचे आंबे आहेत जे सर्वाधिक किमतीला विकले जातात. या आंब्यांच्या प्रजातींची नावे तशी महाराष्ट्रात कमीच माहिती आहेत. म्हणूनच आज भारतातल्या या दोन खास आंब्यांच्या प्रजातींविषयी जाणून घेऊ या!!
तर, आंब्यांच्या या दोन जातींपैकी एकाचे नाव मुघल राणीवरून ठेवण्यात आले आहे, तर दुसऱ्याची निर्मिती थेट नवाबासाठी करण्यात आली होती. एकाचे नाव आहे नूरजहाँ तर दुसऱ्याचे नाव आहे कोहितूर. नूरजहाँ मध्यप्रदेशचा तर कोहितूर हा बंगालचा आहे. यांच्या एकेक आंब्याची किंमत हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. यांची किंमत जास्त असण्यामागे त्यांची कमी उपलब्धता हे पण एक कारण आहे.









